वैजापुरात एकाच दिवशी २ बँकाचे ३ मिनी ग्राहक सेंटर फोडले; लाखोची रोकड लंपास

Foto
 वैजापूर, (प्रतिनिधी)  :  शहरातील स्वस्तिक टॉवर येथील बडोदा बँकेचे मिनी ग्राहक सेंटर चोरट्यांनी १० जानेवारीच्या मध्यरात्री फोडले शटर व चॅनल गेट वाकवून चोरट्यांनी आज प्रवेश करत अंदाजे ५० हजार रुपयांची रोकड लांबवली. सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये २ चोरटे कैद झाले आहे. त्यांची ओळख पटवणे सुरु आहे.

वैजापुरात अनेक चोऱ्याचा तपास प्रलंबित : 
शहरामध्ये काही महिन्यात अनेक मोठ्या घरफोड्या व दुचाकी चोऱ्या झालेल्या आहे. परंतु वैजापूर पोलिसांना त्याचा तपास लावण्यात अपयश येत आहे. सहा महिन्यापूर्वी मुळे गल्ली येथील सराफा
दुकानात झालेल्या आठ लाखांच्या चोरीचा तपास अजून पर्यंत लागलेला नाही ही विशेष बाब आहे.
वैजापूर येथील संजय सखाराम ढोले यांच्याकडे अनिकेत कम्युनिकेशन नावाने बँक ऑफ बडोदा वैजापूर शाखेचे मिनी ग्राहक सेंटर आहे. 

नेहमी प्रमाणे शनिवारी त्यांनी आपले सेंटर बंद करून रात्री घरी गेले. सकाळी त्यांना शेजारी यांचा कॉल आला की तुमचे सेंटर चोरांनी फोडले आहे. तुम्ही लवकर या त्यामुळे ढोले तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस स्टेशनचे जाधव, कांबळे यांनी धाव घेत पाहणी केली. 

पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहे. अश्याच पद्धतीने म्हसोबा चौक स्टेशन रोड जवळील भगवान शिवाजी दरेकर यांचे बडोदा बँकेचे मिनी ग्राहक सेंटर आहे. शनिवारी रात्री त्यांनी आपले सेंटर बंद करून घरी गेले सकाळी आले. तेव्हा त्यांना आपले दुकान फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ वैजापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. तात्काळ या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक भगवान देशमुख उपनिरीक्षक नलावडे उपनिरीक्षक नागरगोजे व पो कर्मचारी विजय जाधव यांनी पाहणी केली. असता ६० हजार रुपये रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले.

त्याच्या बाजूला असलेले बँकेचे मिनी ग्राहक सेंटर याचं पद्धतीने फोडून चोरट्यानी प्रवेश केला. परंतु या ठिकाणी त्यांना काही मिळाले नाही. याप्रकरणी वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहे. वैजापूर शहरामध्ये सध्या दुचाकी, मोबाईल चोर व घर फोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. 

अनेक चोऱ्यांच्या प्रकरणात तपास करण्यात वैजापूर पोलीस अपयशी ठरत आहे. वैजापूरातील गुन्ह्यांची उकल करण्यात सध्या स्थानिक गुन्हे शाखा आघाडीवर आहे. जो काही गुन्ह्याचा तपास लागत आहे. तो स्थानिक गुन्हे शाखा विभाग करत आहे. मग वैजापूर पोलीस करतात तरी काय अशी चर्चा नागरिक करत आहे.